पुण्यात लसीकरणाला परवानगी द्या; अजित पवार करणार केंद्राकडे पाठपुरावा

पुणे : पुण्यात कोरोना लसीकरणाला (corona vaccination) परवानगी द्यावी, यासाठी उपमुख्यमंत्री केंद्राकडे मागणी करणार आहे, असे पुणे प्रशासनाने स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आहेत अशा सर्व ठिकाणी लसीकरणासाठी समान धोरण अवलंबण्याची मागणी खासदारांकडे केली आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीत पवार म्हणाले की, “वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, शहरात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी. याच पार्श्वभूमीवर आता ही मागणी करण्यात येत आहे. केंद्राकडून आणखी लसी मागवाव्यात, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. तसेच बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करणार आहोत. सध्या पार्लमेंट सुरू आहे, याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. फक्त पुणेच नाही, रुग्णसंख्या जास्त आहे तिथे हे धोरण स्वीकारावे, अशी आमची भूमिका आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER