लस घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी द्या ; मनसेची मागणी

Sandeep Deshpande - Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे .

महाराष्ट्रातील (Maharashtra) ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) पूर्ण झालं आहे. त्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

दरम्यान मुंबई लोकल बंद असल्यामुळे कोरोनाचे रुग्ण (Corona Patient) कमी झाले आहेत. मुंबई लोकलवर काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागणार आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. राज्यातील 14 जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा, असेही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले होते .

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button