वैद्यकीय उपचारांसाठी रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Amit Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई : गंभीर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रवास कराव्या लागणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्यासोबतच्या नातेवाइकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली . त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासोबत वाहन खर्चालाही तोंड द्यावे लागत आहे . या गंभीरतेकडे सरकारने लक्ष द्यावे, असे अमित ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे .

दरम्यान अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आहेत. अमित यांनी आपले काका आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती केली आहे.

यापूर्वीही आरोग्यसेवकांचा पगार कमी केल्याची माहिती मिळाल्यानंतर अमित ठाकरे यांनी पुढाकार घेऊन त्यांची बाजू पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. आरोग्यसेवक जोखीम पत्करून नागरिकांची सेवा करत आहेत. त्यामुळेच सगळ्या लढाईला बळ मिळत आहे. अशातच त्यांच्या घरातील व्यवहार नीट चालतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या पगारात कपात न करता त्यांच्या कामासाठी त्यांना अधिक पैसे द्यावेत असे मला वाटते, असे अमित यांनी या पत्रात म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER