हाथरस प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांना यूपीत पाठवा; शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : सुशांत सिंह राजपूत केसमध्ये (Sushant Singh Rajput case) ज्याप्रमाणे बिहार येथे तक्रार नोंदवून बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी आलेत. त्याप्रमाणे आता हाथरस घटनेचा मुंबईत गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (HM Anil Deshmukh) यांच्याकडे केली आहे.

सरनाईक म्हणाले, “देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळिमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत या घटनेचा गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे, अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो.

” सरदेसाई यांनी ट्विटरवरून हाथरस  प्रकरणावर  संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, हाथरस  प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट आहे. तसेच, या बलात्कारप्रकरणानंतर उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER