२१ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना अनुरक्षण गृहात राहण्याची परवानगी द्या : नीलम गोऱ्हे

Neelam Gorhe

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर २१ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाही अनुरक्षण गृहात राहण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी महिला व बालविकास विभागास पत्राद्वारे केली आहे.

अनुरक्षण गृहात राहणाऱ्या ज्या मुला-मुलींचे वय २१ वर्षे पूर्ण झाले, अशांना अनुरक्षण गृहात राहण्याची मुभा नसते. अशा परिस्थितीतून ही मुले-मुली बाहेर निघून चांगली नोकरी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यवसाय करत उदरनिर्वाह करतात.

सध्या राज्यात येरवडा अनुरक्षण गृहात १०० मुलांच्या राहण्याची व्यवस्था आहे. येथे १८ मुले राहतात. तर औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर येथील प्रत्येक अनुरक्षण गृहाची १०० मुलांची क्षमता आहे. यामुळे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या मुलांनी रोजगार गमावला आहे अथवा जे गरजू आहेत, अशा २१ वर्षांवरील अनाथांना अनुरक्षण गृहात राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सामाजिक संस्था आणि अनाथ मुलांकडून करण्यात आली आहे. या अनुषंगाने अनुरक्षण गृहातून बाहेर पडलेल्या मुलांना कडक निर्बंधांची स्थिती सुरळीत होईपर्यंत आर्थिक व धान्याची मदत देण्यासाठी त्वरित निर्णय घेण्यात यावा.

ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नाही, अशांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेशन देण्याचा निर्णय घ्यावा. या मुलांकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्नधान्य मिळत नाही. या तरुणांना रेशन कार्ड द्यावे. तसेच ओळखपत्र असलेल्या मुलांना थेट मोफत रेशन देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button