कार्यक्रमात ५०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी द्या : मंडप असोसिएशनचा मोर्चा

मंडप असोसिएशनचा मोर्चा

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे (Lockdown) डबघाईला आलेल्या मंडप, डेकोरेशन व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात ५०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी आज कोल्हापुरात मंडप व डेकोरेशन व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai) यांना मागण्यांचे निवेदन दिले.

कोरोनामुळे (Corona) सर्व व्यावसायिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती दिली गेली आहे. त्यामुळे या कार्यक्रमांशी संबंधित असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या क्षेत्रात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ व्यवसायासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी आज कोल्हापुरात मोर्चा काढला. कोल्हापुरातील दसरा चौक येथून हा मोर्चा जिल्हाधिकार्यालयावर धडकला. हा मोर्चा ‘ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स ऑर्गनायझेशन’च्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.

प्रमुख मागण्या –

• मंडप, लॉन, मंगल कार्यालये, हॉलच्या क्षमतेपैकी पन्नास टक्के आसन क्षमतेला परवानगी द्या.
• जीएसटी 18 टक्क्यांवरून पाच टक्‍क्‍यांवर आणा.
• गोदाम असणाऱ्यांचे भाडे माफ करावे.कर्जदारांचे व्याज माफ करा
• स्थिती सामान्य होईपर्यंत ईएमआय स्थगित करा.
• मंडप व्यवसाय धारकांना उद्योगाचा दर्जा द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER