शिवसहाय्य पूरग्रस्त केंद्रातून मदत वाटपास सुरुवात

Kolhapur Floods

कोल्हापूर : महापुराच्या विळख्यात अडकलेल्या आणि अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्याची सुटका होऊ लागली आहे. सद्यस्थितीत पूरस्थिती निवळली असली तर आजही जनजीवन विस्कळीत आहे. पूरग्रस्त नागरिकांचे जीवन पूर्वपदावर येण्याकरिता शासन आणि विविध संघटना काम करीत आहेत. पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांचा पुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांना साहित्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातुन बाहेर पडण्यासाठी हजारो मदतीचे हात सरसावले आहेत.
भरघोस मदतीचा ओघ सुरु झाली आहे. इतर अनेक सामजिक संघटनांच्या बरोबरच शहरात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने शिवसेना पुरग्रस्त सहाय्यता केंद्रनसुरू आहे.

शिवसेनेतर्फे तांदूळ, पीठ, कडधान्य, तेल, आदी जेवणाच्या साहित्यासह रोजच्या गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. यासह पुरामुळे घरांचे नुकसान झालेल्या प्रत्तेक कुटुंबास शासनाकडून मदत मिळवून देण्याची आणि पुरामुळे बाधित झालेल्या प्रत्तेक रुग्णाची वैद्यकीय जबाबदारी शिवसेना उचलेल, अशी ग्वाही दिली.

या पूरग्रस्त केंद्रातून मदत वितरणाची सुरवात शिवसेना सहसंपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आली. याचबरोबर शिवसेना आमदार सदाभाऊ सरवणकर यांच्या हस्ते जुना बुधवार पेठ परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना चादर, कपडे, बिस्कीट, पिण्याचे पाणी आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले.