‘अ‍ॅलोपॅथी डॉक्टर राक्षसांपेक्षा वाईट’; भाजप आमदाराचे आरोप

लखनऊ : अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांबाबत (Allopathy doctors) वादग्रस्त व्यक्तव्यामुळे बाबा रामदेव काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अशातच आता भाजपच्या (BJP) एका आमदारानेही डॉक्टरांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. अ‍ॅलोपॅथीचे काही डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट काम करतात, असे आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले. सुरेंद्र सिंह (Surendra Singh) पुन्हा एकदा डॉक्टरांबाबतच्या या विधानामुळे चर्चेत आले आहेत.

अ‍ॅलोपॅथी उपचारामध्ये १० रुपयांची एक गोळी १०० रुपयांना विकली जाते. हे लोक समाजहिताचे काम करणारे नाहीत. रुग्णांच्या मृत्यूनंतरही अ‍ॅलोपॅथी डॉक्टर त्यांना ICUमध्ये ठेवतात आणि कुटुंबीयांकडून पैसे काढतात. त्यामुळे, लोकांनी आता आयुर्वेदिक उपचारपद्धती आणि योगा हे मार्ग स्वीकारायला हवेत. आयुर्वेदीक आणि अ‍ॅलोपॅथी या दोन्ही उपचार सारख्याच आहे, असे मत सुरेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

याचबरोबर, त्यांनी बाब रामदेव यांच्या विधानाचेही समर्थन केले. ते म्हणाले की, “बाबा रामदेव यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून सदृढ आणि सशक्त भारत मोहीम सुरू केली आहे. काही अ‍ॅलोपॅथी डॉक्टर रुग्णांची काळजी घेत अगदी मनापासून काम करत आहेत. पण काही डॉक्टर अत्यंत भ्रष्ट आहेत आणि त्यांचा मी विरोध करतो.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button