राष्ट्रीय लोकशाही आघाडी 300 चा पल्ला गाठणार – IANS- सी वोटर सर्वे

Allies likely to push NDA tally near 300 mark-IANS-CVoter 2019 survey

नवी दिल्ली : मार्च 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांमधील मतांची आकडेवारी दर्शवणारा सी वोटर आणि आयएएनएस ने एक देशव्यापी सर्वे केला आहे. या सर्वेअंतर्गत मुख्यत्वे दोन राष्ट्रीय पक्ष एनडीए आणि युपीएला 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत संभाव्य मतांची टक्केवारी दर्शवण्यात आली आहे.

निवडणुकपुर्व आघाडीची मतांची टक्केवारी काय असेल याचे अंदाजपत्रक आय ए एन एस आणि सी वोटरने केलेल्या देशव्यापी सर्वेनुसार सांगण्यात आले आहे, याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर भाजपा नेतृत्खालील एनडीए सरकारला 42 टक्के मते पडतील तर काॅंग्रेस आघाडीला 30.4 टक्के मतांचा आकडा गाठता येणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सी वोटरने देशव्यापी सर्वे केला त्यामध्ये दोन ओपीनीयन पोल घेण्यात आले. 24 मार्च रोजी जाहीर झालेल्या सर्वेत या आठवड्यातील 10,280 नमून्यांच्या आधारावर मतांची टक्केवारी काढण्यात आली तर, 1 जानेवारीपासून घेतलेल्या सर्वेत 543 लोकसभा मतदार संघामधून सत्तर हजार प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या.

ही बातमी पण वाचा : अंतराळ क्षेत्रात भारत बनला महाशक्तीशाली देश – पंतप्रधान मोदी

भाजपाच्या अजेंड्यानुसार देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, शेती आणि शेतक-यांसाठी आर्थिक तरतूद हे भाजपाचे देशस्तरावरचे मुख्य मुद्दे आहेत. यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजपाला आर्थिक मदत पुरवत असते असेही सर्वेत सांगण्यात आले आहे.

मतदानाच्या अंदाजपत्रकानुसार भाजप आघाडीला प्रमुख राज्यांमधून मोठा फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशात काॅंग्रेस महाआघाडीपासून दूर असल्यामुळे एनडीए ला तिथे 35.4 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.

2014 च्या तुलनेत यंदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राष्ट्रीय पातळीवर कमी जागा मिळतील अशी शक्यता असल्याचा अंदाज सी वोटरच्या सर्वे नुसार वर्तवण्यात येत आहे. 2014 मध्ये मोदी लाटेत एकतर्फी मतदान झाले होते. यंदाची परिस्थिती संमिश्र स्वरूपाची आहे. त्यामुळे यंदा मतांची विभागणी होणार आहे. बिहारमध्ये एनडीएचे मतदानाचे प्रमाण 52.6 टक्के असेल आणि राजस्थानमध्ये एनडीएला 50.7 टक्के मते मिळतील, तर गुजरातच्या भाजपच्या कोट्यात सीवोटर सर्वेच्या आधारावर एनडीएला प्रति 58.2 मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : उप्र : मुरलीमनोहर जोशी यांच्यासह भाजपाने ८ खासदारांचे तिकीट कापले

महाराष्ट्रात एनडीएला 48.1 टक्के मतदानाची अपेक्षा आहे, तर भाजपाप्रणित हरियाणामध्ये एनडीएला 42.6 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.

देशपातळीवर दोन राज्ये अशी आहेत जेथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी दोन्ही महाआघाडींचा तेथे फारसा प्रभाव नाही.

सी वोटरच्या सर्वेनुसार निवडणुकपुर्व आघाडीच्या आधारावर एनडीएला बहूमत मिळणार नाही मात्र, देशस्तरावर 261 जागा एनडीए ला मिळतील अशी शक्यता आहे. तर, 10 मार्चला प्रसिद्ध केलेल्या सर्वेनुसार 264 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता केलेल्या दुस-या सर्वेनुसार विनाआघाडी एकट्या भाजपाला 241 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

निवडणुकपुर्व आघाडीनुसार एनडीए 272 चा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

सीव्होटर्सच्या सर्वेच्या आधारे अंदाज वर्तवण्यात आला की,निवडणुकीनंतर जर एनडीए कोणत्या पक्षासोबत आघाडी केल्यास एनडीएच्या मतांच्या संख्येत कमालीची भर पडण्याची शक्यता आहे. वायएसआर काँग्रेस पार्टीचे नेतृत्व वाय. एस. आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी 10 लोकसभेची जागा जिंकण्याची अपेक्षा आहे, मिझो नॅशनल फ्रंटला एक जागा, बिजू जनता दल 10 जागा आणि तेलंगाना राष्ट्र समिती 16 जागा मिळतील. निवडणुकीनंतर महाआघाडी झाल्यास एकूण 37 जागा एनडीच्या खात्यात जमा होतील. आणि भाजप नेतृत्वाखालील एनडीए 298 जागा जिंकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकपुर्व आघाडीनंतरही आपल्यासोबत अधिक पक्ष कसे जोडले जातील याचा विचार एनडीए करत आहेत. बिहारमध्ये एनडीए ने जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पक्षाच्या सहाय्याने 36 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे, त्यांना एकत्रितपणे 20 जागा मिळतील तर एकटा भाजप 16 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे.

निवडणुकपुर्व आघाडीनुसार महाराष्ट्रात शिवसेना (14 जागा); आसाम – बोडोलँड पीपल्स फ्रंट (एक जागा); पंजाब – शिरोमणि अकाली दल (बादल), एक जागा; तमिळनाडु – एआयएडीएमके (7 जागा): उत्तर प्रदेश – अपना दल (सोनलल), एक जागा. अशाप्रकारे निवडणुकपुर्व आघाडीला एनडीएच्या कोट्यात एकूण सत्ताधारी आघाडीला 47 जागा मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश हे भारतीय राजकारणात महत्वाचे राज्य मानले जाते. उत्तरप्रदेशात एकूम लोकसभेच्या 80 जागा आहेत. उत्तर प्रदेशात एनडीए महागठबंधन करण्यात अद्याप तळ्यातमळ्यात आहेत. निवडणुकपुर्व आघाडीचा विचार केल्यास तेथे 4 राज्यातून एनडीए 28 जागांवर विजय मिळवू शकते. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 2014 च्या निवडणुकीत एनडीए ने उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 73 जागांवर विजय मिळवला होता.

दरम्यान, उत्तर प्रदेशात काॅंग्रेसने निवडणुकीनंतर महाआघाडी केली तर एनडीए च्या मतांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून 52 जागा संयूक्त पूरोगामी आघाडी म्हणजेच काॅंग्रेसच्या खात्यात जमा होतील असे सी वोटरच्या सर्वेत सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात जातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. तेथे निवडणुकीनंतर शेवटच्या मिनीटाला बसपा, सपा , काॅंग्रेस महाआघाडी झाली तर देशाचे चित्र काही वेगळेही असू शकते. कारण उत्तर प्रदेशात जातीनिहाय राजकारणाचा प्रभाव तेथील जनतेवर आहे. याचा थेट परिणाम निवडणुकीत होतो. यामुळे यूपीत काॅंग्रेस महाआघाडी झाल्यास त्याचा फटका थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बसू शकतो असे सी वोटरच्या सर्वेत सांगण्यात आले आहे.