मित्रपक्षांचे माहीत नाही; पण काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार : नाना पटोले

बुलडाणा :- ‘आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. आमच्या मित्रपक्षांचे काय नियोजन आहे याबद्दल कल्पना नाही.’ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे भविष्यात महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

पटोले म्हणाले की, “काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार. ते आमचे मित्रपक्ष आहेत आणि मित्रपक्षांचे प्लानिंग वेगळे असेल, काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरू केली आहे. विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष असल्याने बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु आमच्यासमोर त्यांचा कोणताही प्रस्ताव नाही.” काल नाना पटोले बुलडाण्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्याचा मुख्य उद्देश कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे होते. कोविड सेंटरला पाच मिनिटांची भेट तर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तीन तासांचा दौरा… मात्र, त्यांचा हा दौरा राजकीय गाठीभेटीचा असल्याचे स्पष्ट झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button