‘मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल’; राष्ट्रवादीचा पलटवार

मुंबई : ‘चंद्रकांतदादा रात्री स्वप्न बघतात आणि सकाळी बोलतात. त्यांना त्या स्वप्नात आनंद मिळत असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे. सध्या महाविकास आघाडीचा सत्तेचा बोनस काळ सुरू आहे. महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार पडेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर नवाब मलिक (Nawab Mailk) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“जनता झोपेत असताना आघाडी सरकार निर्णय घेत नाही तर लोकांच्या समोर निर्णय घेते. आघाडी सरकार एकजुटीने काम करते. ‘ऑपरेशन लोटस’ केले पाहिजे अशी काही लोकांची इच्छा आहे. परंतु ते शक्य होत नाही आहे. काहींना सरकार येईल असे स्वप्न पडत आहे. मात्र, हे आघाडी सरकार ५ वर्षे पूर्ण करणारच. शिवाय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे २५ वर्ष टिकेल. त्यामुळे २५ वर्ष स्वप्न बघतच रहा.” असा पलटवार नवाब मलिक यांनी केला आहे.

शिवसेनेला धक्का! नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज कोल्हापूर येथे रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषद मधील १० शिवसेना नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह दहा नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button