महापालिकेतील घरफाळा भ्रष्टाचाराच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप

Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : एखाद्या लहान चुकीसाठी महापालिका कनिष्ठ अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित करत असेल तर घरफाळा विभागात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का? घरफळ यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला यांच्यामागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? कोणता अधिकारी ह्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वाचवत आहे? असा सवाल कॉमन मॅन संघटनेचे ॲड. बाबा इंदुलकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

कोल्हापूर अंबाबाई मंदिरात सुरक्षेसाठी आता डिजिटल “वॉच”

गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने काही कनिष्ठ अभियंत्यांना तडकाफडकी बडतर्फ केले तर काही जणांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या. मग याच न्यायाने घरफाळा विभागातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारास जी कारणीभूत आहेत त्यांना मात्र फक्त कारणे दाखवा नोटिसा बजावले, असे निदर्शनास आणून ॲड. इंदुलकर यांनी म्हटले आहे की, घरफाळा घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल जो प्राप्त झाला ज्याच्या आधारे कारणे दाखवा नोटिसा बजावल्या गेल्या ही सर्व कागदपत्र जनतेसाठी खुली करा आणि अशा वृत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ताबडतोब या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. तुम्ही तसे करणार नसाल किंवा तसे करणे आपल्याला सोयीचे नसेल कागदपत्र आम्हाला द्या. ‘कॉमन मॅन’ फौजदारी गुन्हे दाखल करेल, असेही ॲड. इंदुलकर यांनी म्हटले आहे.