किरीट सोमय्यांच्या आरोप ; शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची चौकशीची शक्यता

Anandrao Adsul-Kirit Somaiya

मुंबई ः  गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेत्यामागे ईडीची चौकशी लागली आहे. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul)  यांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेचा दिग्गज नेता ईडीच्या रडारवर असल्याचं सूतोवाच केलं होतं. त्यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषदेत अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे थेट नाव घेत आरोप केले. अडसूळांची तक्रार रिझर्व्ह बॅंकेकडे करणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं.

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची सिटी को ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे.

“बॅंकिंग क्षेत्रात जे खूप मोठ्या बाता करतात, त्यांच्याकडे पीएमसी बँकेचे पैसे पोहोचले आहेत. काही महिन्यांपूर्वी सिटी बॅंकेचे गुंतवणूकदार आले होते, आनंदराव अडसूळ यांचा विषय पुढे लावून धरणार. पीएमसी बॅंक असो किंवा सिटी बॅंक, दोषींवर कारवाई होणार” असा इशारा सोमय्यांनी दिला. आनंदराव अडसूळांबद्दल आम्ही रिझर्व्ह बॅंकेला कळवणार आहोत, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER