तृणमूलच्या कार्यालयात बॉम्बस्फोट, डावे आणि काँग्रेसवर फोडल्याचा आरोप

Trinamool Congress Office

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) शनिवारी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला बांकुडा येथील तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्याची माहिती पुढे आली आहे. बांकुरातील जॉयपूरच्या तृणमूलच्या कार्यालयात हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी हा बॉम्बस्फोट डावे आणि काँग्रेसच्या आघाडीने केल्याचा आरोप केला आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्ब बनवताना ही घटना घडल्याचा आरोप भाजपकडून केला गेला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी ट्वीट केलं. हिंसेची घटना ऐकूण दु:ख झालं. राजकीय तटस्थता कायम ठेवणे आवश्यक आहे आणि कायद्याबद्दल प्रतिबद्धता दर्शविली जाणे आवश्यक आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना योग्य ती शिक्षा होईल, असं धनखड यांनी म्हटलंय.

दरम्यान, बांकुराच्या जॉयपूरमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. तृणमूलच्या नेत्यांनी डावे आणि काँग्रेस आघाडीवर आरोप केला. तर भाजपने मात्र तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्ब बनवताना हा स्फोट झाला असावा असं म्हटलं आहे.

दुसरीकडे कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मोठी हिंसा भडकली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या हिंसाचारात ३ लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER