किरीट सोमय्यांनी केले आरोप ; ठाकरे सरकारच्या कथित तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

Kirit Somaiya-uddhav thackeray

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) तीन मोठे घोटाळे केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे. मी दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जनतेसमोर मांडणार, असे वचन दिले होते. ते वचन आज मी पूर्ण करत असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत या घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे जाहीर केली. यावेळी त्यांनी ठाकरे आणि नाईक कुटुंबीय यांच्यातील जमीन व्यवहाराचे आणखी नऊ सातबारे प्रसारमाध्यमांच्या हाती सोपवले. त्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या या तीन कथित घोटाळ्यांमध्ये दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (SRA) लाभ घेतल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. आपण आता या सगळ्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेनेकडून किरीट सोमय्यांच्या या आरोपावर काय स्पष्टीकरण देण्यात येणार, हे पाहावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER