मुंडे यांच्याविरुद्धच्या तक्रारीत अडचण आणण्यासाठी हेगडे यांनी केलेत आरोप- रेणू शर्मा

Renu Sharma-Krishna Hegde

मुंबई :-  मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्याच्या वादात उडी घेत भाजपाचे नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी रेणूवर आरोप केला की, तिने मलाही हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता. याला उत्तर देताना रेणू हिने प्रत्यारोप केला की, मुंडे यांच्याविरुद्धच्या तक्रारीत अडचण आणण्यासाठी हेगडे यांनी माझ्यावर आरोप केलेत. रेणूने ट्विट केले – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत कृष्ण यांच्याशी माझी ओळख झाली. माझ्याशी बोलण्याची सुरुवात त्यांनीच केली होती.

कृष्णा यांनी माझ्यावर जे आरोप केलेत ते खोटे व बिनबुडाचे आहेत. हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा व समाजात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. हेगडे यांनी आरोप केला आहे की, रेणू शर्मा नावाची महिला मला २०१० पासून सतत फोन करून आणि मॅसेज करून तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी गळ घालत होती.

माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती अशा प्रकारे जाळे टाकून लोकांना ब्लॅकमेल करते आणि पैसे लुबाडते. मी तिच्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलो. तिला एकदाही भेटलो नाही. दोन दिवसांपूर्वी तिने धनंजय मुंडेंवर आरोप केलेले पाहिले आणि मी पोलिसांना ही माहिती देण्यासाठी पुढे आलो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER