आरोप ठाकरे कुटुंबीयांवर, उत्तर देतंय नाईक कुटुंब : निलेश राणे

Nilesh Rane - CM Uddhav Thackeray - Anvay Naik Family

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अन्वय नाईक (Anvay Naik) प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर भाजपाकडून (BJP) राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपा आक्रमक झाली असून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला होता. यानंतर अन्वय नाईक कुटुंबीयांनी एबीपी माझाशी बोलताना यासंबंधी खुलासा केला होता.यावरून आता भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाईक कुटुंबाला इतकी मिरची लागली की आरोप झालेत ठाकरे कुटुंबावर आणि उत्तर देतायत नाईक कुटुंब. मोठा झोलझाल दिसतोय. फारच जवळचे संबंध दिसतायत, असे म्हणत निलेश राणे यांनी ठाकरे आणि नाईक कुटुंबीयांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली.

दरम्यान किरीट सोमय्या दावा करत असलेले जमिनीचे व्यवहार झाले असल्याची माहिती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली होती. मला बऱ्याच लोकांकडून कळलं असून व्हिडीओदेखील पाहिला आहे. पण याच्यात गुपीत असं काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. किरीट सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रं जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते, असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER