धनंजय मुंडेंवरील आरोप : दोषी आढळल्यास कारवाईची जबाबदारी आमची – शरद पवार

Sharad Pawar - Dhananjay Munde

पणजी : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर माझा मुळीच विश्वास नाही. या प्रकरणी चौकशी होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून शरद पवार सध्या गोवा दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दलच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले. पवार म्हणाले की, ‘काही जणांचा बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनला आहे. या प्रकरणाची वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य काय ते बाहेर येऊ द्या. मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही जबाबदार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER