टूलकिटबाबत काँग्रेसवर आरोप : संबित पात्रा, रमण सिंह यांना नोटीस

Sambit Patra - Raman Singh

रायपूर :- काही दिवसांपासून काँग्रेस (Congress) टूलकिटवरून राजकारण तापले आहे. भाजपाकडून (BJP) काँग्रेसवर (Congress) टीका सुरू आहे. काँग्रेसने आरोपांचे खंडन केले आहे. ट्विटरने या प्रकरणी भाष्य केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे दिसते. या प्रकरणी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) व माजी मुख्यमंत्री रमण सिंह (Raman Singh) यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन, मोदींना बदनाम करण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत असल्याचा दावा केला होता. संबित पात्रा यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. यावरून संबित पात्रा यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी संबित पात्रा यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असून, हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रमण सिंह

याच प्रकरणी रायपूर पोलिसांनी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते रमण सिंह यांना जबाब नोंदवण्यासाठी २४ मे रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. संबित पात्रा आणि रमण सिंह यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे.

संबित पात्रा यांनी कोरोनावरून (Corona) सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. काँग्रेसची एक कथिट टूलकिट दाखवली. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या इंडियन स्ट्रेनला ‘मोदी स्ट्रेन’ म्हणायचे आहे. कुंभमेळ्याला ‘सुपर स्प्रेडर’प्रमाणे सांगायचे आहे. परंतु ईदबाबत काहीच बोलायचे नाही, असे पात्रा यांनी कथित टूलकिट दाखवताना म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button