राष्ट्रवादीच्या पुन्हा एका नेत्यावर बलात्काराचा आरोप, पीडितेची पत्रपरिषदेत माहिती

Allegation Againt - NCP Leader - Maharastra Today

पुणे : परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर (Rajesh Uttamrao Vitekar) यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पीडितेने विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.

माझे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. मी तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, पण फक्त तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांच्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असा दम राजेश विटेकरमला देत आहेत, असा दावा पीडितेने केला. राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button