‘ठाकरे’ सरकारमधील मंत्र्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही; नारायण राणेंचा गंभीर आरोप

Narayan Rane

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) निकाल दिला. त्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची या संदर्भात भेट घेत निवेदन सादर केले. या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते नारायण राणे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच जबाबदारी झटकण्याचं काम सरकराच्या शिष्टमंडळाने केले आहे.

ठाकरे सरकारमधील मराठा मंत्र्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं, असा गंभीर आरोप राणे (Narayan Rane) यांनी केला. यावेळी राणे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यपालांना निवेदन देण्याची घाई का? त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते, सर्व मराठा संघटनांचे नेते, तज्ज्ञांना बोलवा. विचारविनिमय करा, चर्चा करून पुढल्या रणनीती आखा, असंही राणेंनी म्हटलं. तसंच मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही. त्यांना आपलं मंत्रिपद टिकवण्यात रस असल्याचा टोलाही राणेंनी लगावलाय. सरकारच्या ओठात एक आणि पोटात एक आहे. मराठ्यांना आरक्षण देणं हे या सरकारच्या मनात नाही. त्यामुळे मराठ्यांनी आता एक होण्याची गरज आहे.

सगळ्या मराठा संघटनांनी एक व्हायला हवं. समाजानेही एकत्र यायला हवं, असं आवाहन राणे यांनी केलं. जरी यांनी हात झटकले तरी मराठा समाज यांना सोडणार नाही. केंद्र काय निर्णय घ्यायचा तो घेईल. पण आम्ही यांना इथं पकडणार की तुम्ही तो सर्वोच्च न्यायालयाचा रिपोर्ट जो आहे, त्याला अपील करा. केंद्र सरकारला सांगा करायला. केंद्राला सांगायला तसे संबंधदेखील तयार करावे लागतात. ऊठसूट केंद्राला दोष देतात. मी शिवसेनेत ३९ वर्षे राहिलेलो आहे, त्यांच्या नेत्यांना जवळून पाहिलेलं आहे, खरं तर यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं, मनात नव्हतं. आता जे दाखवत आहेत, त्यांच्या पोटात एक आणि ओठावर एक आहे. हे रद्द झालं याचा त्यांना उलट आनंद आहे, त्यांना दुःख झालेलं नाही, असं यावेळी नारायण राणेंनी बोलून दाखवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button