अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है … ! जितेंद्र आव्हाड यांचे अफलातून विधान

Jitendra Awhad

ठाणे : मतदारांना खुश करण्यासाठी नेते काय बोलतील याचा भरोसा नाही. मुंब्रा येथील नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणालेत, अल्लाह को पता था कोरोना (Corona) आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना! आव्हाड यांच्या या विधानावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

जितेंद्र आव्हाड म्हणालेत, अल्लाह को २०११ में मालूम था कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में २०१९ में कब्रस्तान बना! आव्हाड हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. कोरोनाच्या संकटातील आपले यश – अपयश झाकण्यासाठी त्यांनी थेट अल्लाचाच आधार घेतल्याची टीका सुरू झाली आहे. कोरोनाचे संकट येणार हे अल्लाहला २०११ सालीच दिसले म्हणून २०१९ ला कब्रस्तान बनले, असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचे राजकारण आव्हाड यांनी केल्याचे व्हिडिओवरून दिसते. आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर आव्हाड यांनी खुलासा केलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER