“ये सब मेरे ही साथ क्यू !”

Girl - Maharashtra Today

“अहो, आमचा दर्शन अजिबात ऐकत नाही. खूप आक्रस्ताळेपणा करतो. एखादी वस्तू हवी म्हटली की घेतल्याशिवाय राहत नाही.”

“काय सांगू राजुला हे सिगारेटचे व्यसन कधी लागलं काहीच कळत नाही आणि मला शंका आहे तो वेगळेच काहीतरी खातो देखील !”

“श्याम रावांच कुणाशी कधी पटत नाही, घरी-दारी कुठेच नाही.” क्लिनिक मध्ये असे निराशेचे उद्गार सतत ऐकू येत असतात.”

पण हे काही खूप जगावेगळे विचार नाही .तुमच्या माझ्याही मनात हे विचार अधून मधून केव्हा ना केव्हा येतच असतात” ये सब मेरे ही साथ क्यू ?”पण मला याचे उत्तर मिळालेय फ्रेंड्स !

सकाळची पहाटेची वेळ, मंद येणारी गार वाऱ्याची झुळूक, अलगद स्पर्श करून जाते. अगदी तशाच आपल्या बालपणीच्या आठवणी आल्या की असंच वाटतं न? मग आठवते आपण केलेली पतंगांची काटाकाटी, वाळूच्या ढीगामध्ये बांधलेले खोपे, मांजा बनवण्यासाठी काचा कुटणे, खेळभांड्यात बनवलेला पोह्यांचा भात, आजी-आजोबांच्या घरातील नातवंडांचा धुडगूस ! हे ऐकून तुम्हीही दहा, पंधरा ,वीस वर्षे मागे गेलात ना ! आणि मग त्या तुलनेत आजच्या मुलांचं बालपण? खूपच वेगळं काही वाट्याला येते आहे त्यांच्या ! आपण सगळी मोठी माणसं आज ज्या स्ट्रेस खाली जगतो त्या पद्धतीने आपले आपल्या मुलांशी संवाद साधतो, इंटरॅक्शन होतं त्याचा जर विचार केला , विश्लेषण केलं, अनालिसिस करत गेलो तर या ,”ये सब मेरे ही साथ क्यू ?” मुलं अशी का वागतात ? किंवा आमचं दोघांचं नातं असं का ? त्याची कारणे समजत जातात.

ट्रांजेक्शनल अनालीसिस, एक मानसशास्त्रातील थेरपी आहे .यामध्ये एरिक बर्न त्याने प्रत्येक व्यक्ती मध्ये, पॅरेण्ट ,एडल्ट, चाइल्ड (P -A -C) पालक , प्रौढ, आणि बालक हे तिन्ही स्टेटस सामावलेल्या असतात. परंतु व्यक्तीची घडण होत असताना, त्याला आलेल्या अनुभवानुसार व मिळालेल्या वातावरणानुसार प्रत्येक व्यक्तीचा कुठला घटक prominant आहे ते ठरतं. आणि ते कायम बदलतही असत .असं म्हटले आहे.

हे समजून घेण्याचा एक फायदा असा असतो की :

  • जेव्हा व्यक्ती व्यक्तींमध्ये संवाद घडतो तेव्हा, तो समोरचा व्यक्ती कुठल्या स्टेटमध्ये बोलतो आहे, किंवा समोरच्या व्यक्तीचा कुठला घटक prominant आहे हे जर ओळखता आलं, तर त्यावरून आपण पूरक , योग्य स्टेट मध्ये जाऊन, त्याला प्रतिसाद देऊ शकतो .त्यामुळे होणारा संवाद ,विसंवाद न होता त्याला सुसंवादाकडे वळवता येऊ शकतं.
  • दोन व्यक्तींमध्ये घडणारे संवाद हे तीन प्रकारचे असतात, पूरक , छदक, समांतर. कुठले योग्य आणि कुठले अयोग्य हे देखील आपण या विश्‍लेषणातून समजू शकतो .ज्यामुळे पालक आणि मुलं, शिक्षक आणि विद्यार्थी, पती-पत्नी, ऑफिसमधले सहकारी अशा कुठल्याही प्रकारच्या नात्यात सुसंवाद साधणे सोपे जाते.
  • म्हणूनच हे बालक ,पालक ,आणि प्रौढ हे वयाच्या कोणत्या टप्प्यात विकसित होतात ? त्यांच्या विकासावर कशाकशाचा आणि कसा परिणाम होतो ? आणि ते स्वतः आणि इतरांसाठी कुठल्या धारणा यावरून तयार करतात तेही आपल्याला समजू शकतं. कुठल्याही अयोग्य धारणेतून “आय एम ओके, यू आर ओके !”या धारणे पर्यंतची वाटचाल करण्यासाठी पालक ,बालक आणि प्रौढ समजून घेणे खूप गरजेचे आहे.

फ्रेंड्स ! मनाच्या कॉम्प्युटर मध्ये ऑडिओ, व्हिडिओ व भावनांचे रेकॉर्डिंग होत असते. त्यामुळे ३ वेगवेगळ्या स्टेट्स किंवा फाईलस् म्हणू या ,ह्या ओपन होत जातात.

@ Child file : या फाईलला सुरुवात होते ती अगदी गर्भावस्थेपासून , वयाच्या तीन महिन्यापर्यंत ही असते. गर्भ संस्कार किंवा बाळ पोटात असताना आई आनंदित का हवी यासंबंधीचे मूळ येथे आहे. अभिमन्यू चे उदाहरण नेहमी देतात. तेथूनच मुलांच्या मनातील ताणतणावांना देखील सुरुवात होते. मग मुलाचा जन्म होतो, तो पहिला श्वास घेतो आणि ” टाहा s “आवाज करत रडतो. तो काय म्हणत असतो ? “I am not ok ,I am not ok ! “परंतु थोड्याच वेळात नर्स त्याला छान गुंडाळून त्याच्या आजी जवळ देते आणि मग ते मूल शांत होतं .आईच्या सुरक्षित उबदार कुशीतून बाहेर आल्यावर त्याला एकदम भगभगीत प्रकाश ,थंडी वाजते, आणि त्यातून ही not ok ! ची भावना येते. जन्मापासून तीन महिने , या काळात मूल पूर्णपणे परावलंबी असते. प्रत्येक गोष्टीसाठी मोठ यांवर अवलंबून असते. ते स्वतः काही करू शकत नाही .मग आईचा चेहरा दिसला की खुश होऊन” यु आर ओके !” हे चालू राहते. अशी ही पहिल्या फाईल मधली भावना, बिलिफ ठरते …

“I am not ok – you are ok ! ” ही फाईल आणि पुढची पॅरेण्ट फाईल या दोन्हींमध्ये जे रेकॉर्डिंग असते ते परमनंट असते. याचे केवळ वारंवार रिप्ले ( आठवणी ) पुढच्या आयुष्यात होत राहतात.

@ Parent file : ही फाईल वयाच्या तीन ते दहा महिने पर्यंतचे अनुभव सांभाळणारी असते. यामध्ये मुल जे बघते ,ऐकते,करून बघते ,स्वतःला हव्या त्या हालचाली करता येतात. खोड्या वाढतात. अनुभव विश्व मोठे मोठे होत जाते. आता

यामध्ये पालकांकडून काही नोंदी यात होत राहतात.-

*– काय करावे काय करू नये !म्हणजे Do’s & Don’t s. * — नेहमी लक्षात ठेव, कभी भी मत करना l
*– हे असं आणि असंच करायचं असतं. परफेक्शन. * — आम्ही सांगतो म्हणून …..,
*– पालकांना वाटणाऱ्या भीती ,चिंता. *– नैतिक मूल्य ,खोटे कधी बोलू नये .
*– घरातील मोठ्यांची वागण्याची वृत्ती,

म्हणजे स्त्री म्हणजे पायातली वहाण .भ ची बाराखडी असलेले अर्वाच्च शब्दही याच काळात मूल शिकते. कुणी स्टाईल मध्ये सिगारेट पीत असेल तर तेही अनुकरण करत. कारण या काळामध्ये त्यांची का आणि कसं हे विचारायची तयारी होत नाही .आणि मग या काळात पालकांची वागणूक व त्यांच्या निरीक्षणातून येणारे अनुमान यातूनच जगण्याचा मार्ग ठरतो. म्हणजेच मुलांची वाटचाल पुढे “आय एम नॉट ओके” वरून” आय एम ओके” कडे होणार की नाही ते इथे ठरतं .

आयुष्यभर जर “अनएडिटेड” ही फाईल राहिली याचा replay वाजत राहतो. काय नसत हो या फाईल मध्ये ? आजीच्या हातचा गरम वरण, भात, तूप, लिंबू त्याची चव, आईच्या खांद्यावर मान टाकून बघितलेला चांदोमामा, थोपटण्यातून मिळणारे positive strocks ! परंतु हे सगळे चांगले अनुभव झाले .नाही तर मग “आय एम ओके” ची पुढची बाजू बदलून , “यू आर नॉट ओके “व्हायला वेळ लागत नाही. अशी मुले खूप दुर्दैवी.

कधीतरी मनाविरुद्ध घडलेल्या घटनांची “नोट ओके” ही फाईल उघडते आणि आपण म्हणतो,” ये सब मेरे ही साथ क्यू !” साधारण मुल शाळेत जाई पर्यंत या फाईल पूर्ण झालेल्या असतात. तुम्हाला वाटेल झाल ! आता तर आपल्या सगळ्या हाताबाहेर गोष्टी झाल्या. आता कळून काय उपयोग ? पण तसं नाही. सुधारणेला वाव आहे. ती म्हणजे —

@ Adult file : याचे रेकॉर्डिंग हे विचारपूर्वक गोष्टींचे आणि निर्णयाचे असते .बऱ्याच पालकांच्या सूचनांचा हेतू खूप छान असतो ,पण तो मोठेपणी अडचणीत टाकतो. किंवा त्या त्या परिस्थितीला तो अनुकूल असतात. जसं की लहानपणी माझ्या आईची सूचना असायची , “झाडाझुडपात गवतात लपू नका ग! विंचूकाटा असतो.” घराभोवती भरपूर झाडं ,गवत आणि जाईजुईचा मांडव होता. त्याच्या बुंध्यापासून बरेच साप निघत. ही गोष्ट माझ्या “पॅरेण्ट फाईल” मध्ये इतकी पक्की बसली, की आता तशी काही परिस्थिती नसतानाही मला सापाची भयानक भीती वाटते. अशावेळी ही पॅरेण्ट फाईल तपासून तिला एडल्ट मध्ये टाकायला हवीच. ही फाईल ओपन आपण दहा महिन्याचे झाल्यापासूनच होते. कारण त्यावेळी आपण छोटे-छोटे आपले निर्णय घ्यायला लागतो .उदा. आपल्याला लहान बाळाला आईकडून घ्यायचं आहे. ते यायला अजिबात तयार नाही. मग आपण पायात चपला घालतो, हातात गाडीची किल्ली घेतो, आणि म्हणतो भुर् s ! बाळ ह्या सगळ्याचे निरीक्षण करून पटकन आपल्याकडे झेप घेतो..याचा अर्थ त्याला विचारशक्ती आलेली आहे. हे अनुभवांवर केलेले प्रोसेसिंग आहे.
ही फाईल महत्त्वाची का ?

परेंट व चाइल्ड फाईल मध्ये घरात जर सतत वादविवाद होत असतील, देण्यात येणाऱ्या सूचना आणि कायदे हे योग्य नसतील व्यवहार्य नसतील, आपलं स्वतःचं वर्तन त्या कायद्यानुसार नसेल, सतत नकारघंटा वाजवत असू ,तर मुलाची सर्व क्रिएटिव्हिटी ची शक्ती कुतूहल निघून जाते आणि मग मनाला गुंतवणारी कॉम्प्युटर गेम सोशल मीडिया यांचे व्यसन लागते.
आपण केलेले कायदे नियम सूचना योग्य असतील आणि आपले वर्तन व्यवहार या नियमांमध्ये बसत असतील, तर त्या एडिट करून , बदलाव्या लागत नाहीत. त्यामुळे पेरेंट्स बद्दलची विश्वासार्हता वाढते. मोठेपणी मुले शब्दाबाहेर जात नाहीच, नाहीतर हल्ली मुले ऐकतच नाही ही तक्रार करावी लागते. म्हणून प्रेम, कुतूहल शमवणे हे चाईल्ड फाईल मध्ये, तर चांगले संस्कार ,सवयी आणि शिस्त हे पॅरेण्ट फाईल मध्ये व्हायला हवे.

# पण याउलट रडू नको ,गप्प बस ! तोंड बंद कर ! हा काय पसारा मांडून ठेवलाय. त्यामुळे चाईल्ड फाईल बंद होते.
# कधीच प्रेम नाही ,लाड नाही, कोणत्याही गोष्टीची चाड नाही..! अमानुष वागणूक मिळत असेल तर नीती संस्कार कायदे सब झूट वाटू लागतात. आणि पॅरेण्ट फाईल बंद होते. उदाहरणच द्यायचं झालं तर व्ही शांताराम च्या दो आखे बारा हात मधील कैदी.
# जर विचार शक्ती नसणे, वस्तुस्थितीची जाणीव नसणे, जन्मतः किंवा अपघाताने मेंदूवर परिणाम झालेला असणे अशावेळी मानसरोगतज्ञांची मदत लागते. एडल्ट फाईल क्लोज असते. (तो पूर्ण वेगळा विषय आहे.)
फ्रेंडस ! यावर तुम्हाला ” ये सब मेरेही साथ क्यू ?” याची बीजे कुठे रोवली जातात. हे लक्षात आले असेल.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button