राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार

Mahatma Phule Jan Arogya Yojana

मुंबई :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे अश्या रुग्णांना उपचारासाठी कुठलीही अडचण होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केली आहे. तसे परिपत्रक राज्य शासनाने निर्गमित केले आहे.

राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार, आता सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेता येणार आहे. उपचारासाठी लागणाऱ्या ऐकून बिलापैकी ८५ ते ९० टक्के रक्कम हे राज्य सरकार वहन करतील. तसेच या योजनेअंतर्गत आता नागरिकांना कोरोनाचाही उपचार घेता येऊ शकेल.

Check PDF


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER