राऊतांनी आता न्यायालयाने काय करायला पाहिजे हेच सांगणे बाकी होते? , भाजपकडून कारवाईची मागणी

Sanjay Raut

मुंबई :-  “संजय राऊत (Sanjay Raut) यांची वक्तव्ये बेताल आणि बेजबाबदार आहेत. आज तर थेट न्यायालयाने काय केलं पाहिजे हेच ते सांगत आहेत. राऊतांनी आता न्यायालयाने काय करायला पाहिजे हेच सांगणे बाकी होते का ? अशा आशयाचे विधान करत संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी” असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Praveen Darekar)म्हणालेत.

संजय राऊत यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत (Kanjurmarg Metro car shed) हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर टिपण्णी केली होती. हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे. ही जमीन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता. महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे (Maharashtra BJP) असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.

त्याबाबत प्रविण दरेकर म्हणाले, “आम्हाला सत्ता गेल्याच दुःख नाही, कारण भाजपचे दोनवरुन 300 पर्यंत खासदारांची संख्या पोहोचली आहे. त्यामुळे त्याची चिंता राऊतांनी करु नये. संजय राऊतांनी कोर्टावर असं भाष्य करणे हा कोर्टाचा अवमान आहे. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. सर्वोच्च न्यायव्यवस्था असताना त्यांच्यावरच असे आरोप करणे चुकीचं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे”

संजय राऊत काय म्हणाले?

‘कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायानं देशाच्या विकासाचा विषय आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. याच जमिनीवर मागील सरकार पोलिसांसाठी, गरीबांसाठी घरं बांधणार होतं. मग आता ही जमिन सरकारची नाही का? अशाप्रकारच्या प्रकल्पाला विलंब होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा आणि सरकारला बदमान करायचं, हे काम सध्या सुरु आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली.

ही बातमी पण वाचा : भाजपच दुःख समजू शकतो, पण महाराष्ट्राला त्रास देणं चालणार नाही; संजय राऊतांचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER