जेएनयूत डाव्या विध्यार्थी संगठनांनी जिंकल्या सर्व जागा

JNUSU-1

दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये पुन्हा डाव्या संघटनांच्या ‘लेफ्ट युनिटी’ ने विद्यार्थी संघाच्या चारही महत्वाच्या जागा जिकल्या. डाव्यांचा गड सर करण्यासाठी पूर्ण ताकद लावणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी(अभावप) परिषदेचा सर्व जागांवर पराभव झाला.

अभाविपला दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर ‘बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन’ (बापसा) तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या तोडफोडीमुळे येथे मतमोजणी थांबवण्यात आली होती, आज तणावपूर्ण परिस्थितीत मतमोजणी पूर्ण करण्यात आली.

विद्यार्थी संघाच्या चार महत्वाच्या पदांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. काल मतमोजणीला सुरू असताना मध्येच गोंधळ घालण्यात आला. मतपेट्या पळवून नेण्याचा प्रयत्न झाला होता आणि तोडफोडही झाली. त्यानंतर मतमोजणी रद्द करण्यात आली होती. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी ही तोडफोड केली, असा आरोप डाव्या संघटनांकडून करण्यात आला आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाव्या संघटनांचा एन. साई बालाजी हा विजयी झाला. उपाध्यक्षपदीही डाव्या संघटनेची सरिका चौधरी विजयी झाली. महासचिवपदी एजाज अहमद राथेर आणि संयुक्त सचिवपदी अमुथा जयदीप विजयी झाला. हे दोघेही डाव्या संघटनांचे आहेत.