उद्या फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांची बैठक; कडक लॉकडाऊनची शक्यता

CM Uddhav Thackeray - Raj Thackeray - Devendra Fadnavis

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) थैमान सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात उद्या पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे सरकार आता संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil), विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil), मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित असणार आहेत.

MPSC परीक्षा पुढे ढकलली
MPSCची ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ ची संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० पुढे ढकलली आहे. हा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. कोरोना स्थिती लक्षात घेता या परीक्षेच्या तारखा MPSC मार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button