मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक; देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray - Maratha Reservation

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे . यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अखेर या बैठकीसाठी भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्य सरकारकडून निमंत्रणाचा निरोप देण्यात आल्याची माहिती आहे .

आज संध्याकाळी मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सायंकाळी ६.३० वाजता मराठा आरक्षणासंदर्भात विविध पक्षांच्या नेत्यांसमवेत ही बैठक सह्याद्री अतिथिगृहात होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत राहणार आहेत. या बैठकीला महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) इतर मंत्रीही हजर राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER