काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचे नेते कृष्णकुंजवर, राज ठाकरेंचा थेट अधिकाऱ्याला फोन

मुंबई : पुण्यातील सोमाटणे टोल नाका बंद करण्याप्रकरणी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीसह (NCP) शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांनी आज मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. तळेगाव आणि येथील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा अशी मागणी या नेत्यांनी राज ठाकरेंना केली. फक्त दीड किमी अंतरावर दोन टोलनाके असल्याने कायद्याला हरताळ फासून नागरिकांची लूट सुरु असल्याचं सर्व पक्षीय शिष्टमंडळाने सांगितले.

सर्व पक्षीय शिष्टमंडळानी दिलेल्या माहितीनंतर, ताबडतोब राज ठाकरे यांनी IRB Infrastructure चे विरेंद्र म्हैसकरांना फोन केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील या विषयावर बोलतो, असं सांगितले. त्यानंतर विरेंद्र म्हैसकर यांनी देखील यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासन राज ठाकरेंना दिले.

राज ठाकरेंना भेट देणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि जनसेवा विकास समिती यांचा समावेश होता, अशी माहिती जनसेवा विकास समिती, तळेगाव दाभाडेचे प्रवक्ते मिलिंद अचुट यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना दिली. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील टोलचे प्रश्न व्यवस्थितपणे हातळल्याने आम्ही त्यांची भेट घेतली असं मिलिंद अचुट यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या टोलनाक्याप्रश्नी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची देखील भेट घेतल्याची माहिती मिलिंद अचुट यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER