सक्तीच्या वीज बिल वसुलीविरोधात १९ तारखेला राज्यभर आंदोलन करणार : राजू शेट्टी

Raju Shetty

मुंबई :- सक्तीच्या वीज बिल वसुलीविरोधात १९ मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. सरकारकडून अचानक सक्ती केली जाते. सर्वसामान्यांनी पैसे कुठून आणायचे? असा सवाल त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.

राज्य सरकार अशी अचानक सक्ती करूच कसं शकतं? असं म्हणत दोन मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्य जनतेचा जीव जातोय. अशी अचानक सक्ती केली जाते तर पैसे आणायचे कुठून? त्यामुळे ग्राहकांना वीज बिल भरायला एक महिन्याचा वेळ द्यायला हवा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. दरम्यान कोल्हापुरात सक्तीच्या वीज वसुलीविरोधात सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER