भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Sharad-Pawar-Uddhav-Thackeray

मुंबई : शनिवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. त्यानंतर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीत काहीतरी शिजत आहे असे तर्क लावल्या जात होते. मात्र आता शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा तपशील समोर आला आहे.

फ्री जर्नालिजम या वृत्तपत्राने या भेटीचा तपशील प्रसिद्ध केला आहे. कोरोना नियंत्रणावर लक्ष केंद्रित करून, अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांना सामोरे जाण्यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच कुठलाही निर्णय घेताना आणि सरकारच्या कामकाजात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांसोबत समन्वय साधण्यावरही पवारांनी भर दिला.

सोबतच, अकाली दलाने एनडीए सोडण्याचा आणि शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षी शिवसेनेप्रमाणे भाजपच्या आणखी एका जुन्या मित्रपक्षाने एनडीए सोडल्याची आठवण करून देत अकाली दलाच्या या निर्णयाचे पवार यांनी स्वागत केले. भाजपविरोधात महाराष्ट्रातीलच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही सर्व विरोधीपक्षांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : आदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का? शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER