आता एप्रिल 2019 पासून सर्वच नवीन वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट

hsrp

नवी दिल्ली :- येत्या एप्रिल 2019 पासून सर्वच वाहनांवर आधीपासूनच लावलेली उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) लागून येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक तसेच महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने केंद्राचा मोटर वाहन कायदा 1989 मध्ये या अनुषंगाने सुधारणा केली आहे.

या नोटीफिकेशननुसार उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट आवश्यक असून तिसरा नोंदणी मार्क वाहन उत्पादक पुरवेल तसेच ज्या वाहनाचे 1 एप्रिल 2019 ला किंवा त्यानंतर उत्पादन केले जाईल, त्यांच्या सोबत ही प्लेट असेल. डिलर्स नोंदणीचा हा मार्क या प्लेटवर लिहेल आणि ती त्याच्या वाहनावर असेल. वाहन डीलर्स ही एचएसआरपी प्लेट जुन्या वाहनांवर लावणार नाही.

उत्पादकाला वाहनाच्या गुणवत्तेची खात्री देता यावी म्हणून एचएसआरपी प्लेट लावण्याचे हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. एचएसआरपी प्लेटमुळे वाहनावर लक्ष ठेवणे तसेच हरविणे किंवा चोरी जाण्याच्या स्थितीत त्याचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

1989 च्या केंद्रीय मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. याबाबत जनतेकडून काही आक्षेप किंवा सूचना नोंदवावयाच्या असल्यास त्या स्विकारल्या जातील, असेही यात म्हटले आहे. या कायदा दुरुस्तीमुळे ज्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. अशांकडून सरकारने यावर्षीच्या एप्रिल महिन्यात आक्षेप तसेच सुचना आमंत्रित केल्या होत्या.