सर्व पक्षांचे आमदार सुरक्षितस्थळी, मात्र राष्ट्रवादींच्या आमदारांना उदयनराजेंचा फोटो पाठवला: ट्विट

Jitendra Awhad - Udyanraje

मुंबई :- राज्यातील सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला असून आमदारांचा घोडेबाजार होत असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार आपापल्या घरी आहेत. कारण त्यांना उदयनराजेंचा फोटो मॅसेज केला असल्याचे ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी चिमटे काढले आहे.

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना रंगशारदा येथे बोलावले असून तिथून एका अनोळखी ठिकाणी रवाना होणआर आहेत. तर काँग्रेसचे आमदारही जयपूरला गेल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार एखाद्या अज्ञात स्थळी गेल्याचे कोणतेही वृत्त नाही. त्यामुळे शिवसेना आमदार रंगशारदा, काँग्रेस आमदार जयपूर आणि राष्ट्रवादीचे आमदार आपआपल्या घरी, यावर म्हटले गेले आहे. कारण राष्ट्रवादीच्या आमदारांना उदयन राजेंचा फोटो मॅसेज केला आहे. हा मॅसेज करणा-याला सलाम, असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर फॉरवर्ड झालेला मेसेज आव्हाडांनी शेअर केलेला दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : धसका पवारांचा; “उदयनराजे” होण्याच्या भीतीने नवे आमदार तठस्थ!