सर्व सामने ‘फिक्स’ असतात; बुकी संजीव चावल्याने काढली क्रिकेटची अब्रू

Sanjeev Chawla

दिल्ली : ‘कोणताही क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही. लोक पाहतात ते सर्व सामने ‘फिक्स’ असतात. यामध्ये अंडरवर्ल्डच्या माफियांचा संबंध असतो. ज्याप्रमाणे चित्रपट कोणीतरी दिग्दर्शित करतो, तसेच क्रिकेट सामन्याचे असते, अशी क्रिकेटची अब्रू काढणारी माहिती बुकी संजीव चावल्याने दिली.

२००० च्या मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरलेल्या संजीवला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याने पोलिसांना उल्लेखित माहिती दिली. संजीव सध्या जामिनावर बाहेर आहे. मूळ दिल्लीचा निवासी असलेला संजीव लंडन येथून बुकीचा व्यवसाय चालवत होता. कापडाच्या व्यवसायासाठी १९९३ ला तो लंडनला गेला. ऑक्सफर्ड स्ट्रीटवर त्याचे दुकान आहे. २००० ला त्याला ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले.

२००० च्या दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात अनेकांनी मॅच फिक्सिंग केली होती. या फिक्सिंगबाबत दक्षिण आफ्रिकेचा हॅन्सी क्रोनिए आणि चावला यांच्यातील संवादाचे पुरावे मिळाले. हॅन्सी क्रोनिए याने स्वतःही मॅच फिक्सिंग केल्याचे मान्य केले होते. २००२ ला हॅन्सी क्रोनिएचा विमान अपघातात मृत्यू झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER