महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल; शिवसेनेकडून कंगना प्रकरण हाताळताना नेतृत्त्वाला धक्का

MVA Govt-Kangna Ranaut

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranaut) आणि शिवसेनाच वाद आता चांगलाच पेटला आहे . या प्रकरणावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत काँग्रेस नेतेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे . तसेच शिवसेनेकडून कंगना प्रकाणाला उगाच महत्त्व दिले जात असल्याचीही चर्चा सुरु आहे .

अभिनेत्री कंगना रणौतने सुशांत सिंह प्रकरणावरुन तपास करताना मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होती. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगनाला मुंबई सोडून जाण्याचा सल्ला दिला. कंगनाविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होऊ लागल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली. या सर्व घडामोडी सुरु असतानाच कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. या सर्व घडामोडीवरून शिवसेनेकडून कंगना प्रकरण हाताळताना नेतृत्त्वाला धक्का लागल्याचा आरोप सत्ताधारी मित्र पक्षाकडून करण्यात येत आहे .

तत्पूर्वी सुशांत सिंह प्रकरण हाताळण्यावरुन राज्य सरकारला टीकेला सामोरं जावे लागत असताना कंगना प्रकरणामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सुरु आहे .

ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, “कंगनाकडे दुर्लक्ष करायला हवं होतं. उगाच तिला महत्व दिलं जात आहे”. दुसऱ्या एका नेत्याने हा ‘सेल्फ गोल’ असल्याची टीका केली. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनीही नाराजी व्यक्त करत टीका केली. “सत्तेत असताना तुम्ही अशा गोष्टी करु शकत नाही. तुम्ही अत्यंत चुकीचा संदेश पाठवत आहात. कंगना कदाचित भाजपाच्या संपर्कात असेल, भाजपाच्या सांगण्यावरुन ती हे सर्व करत असेल, पण मग तुम्ही त्यांच्या जाळ्यात का अडकत आहात ? मी शांत बसू शकत नाही. हे खूप वाईट दिसतं,” असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे मिलिंद देवरा यांनीही सर्व पक्षांनी एकत्र येऊन आपली प्राथमिकता ठरवली पाहिजे असे ट्विट करत प्रशासनाऐवजी राजकीय गोष्टींकडे लक्ष देण्यावरुन नाराजी व्यक्त केली.

दरम्यान काल उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. यावेळी मुख्यत्वे मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. यावेळी पवारांनी उद्धव ठाकरेंनी तडकाफडकी घेतलेल्या नाराजी व्यक्त केली आहे .

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER