
नवी दिल्ली : ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ तर्फे (BCI) घेतली जाणारी वकिलीची अखिल भारतीय परीक्षा (All India Bar Exam-AIBE) आता २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. कोणत्याही नव्या वकिलास वकिलीची सनद मिळाल्यानंतर प्रत्यक्ष वकिली करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे असते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. आता होणारी परीक्षा ही सोळावी परीक्षा असेल. आधी ती २१ मार्च रोजी होणार होती. परंतु बार कौन्सिलने एका अधिसूचनेने परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
त्यानुसार परिक्षेसाठी आता २५ एप्रिल ही नवी तारीख ठरविण्यात आली आहे. परिक्षेसाठी इच्छुक उमेदवारांची ऑनलाइन नोंदणी २६ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. ती आता २२ मार्चपर्यंत सुरु राहील. २६ मार्चपर्यंत परीक्षा फी आॅनलाइन भरता येईल. ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन नोंदणी व फी भरणे पूर्ण करावे लागेल. उमेदवारांना १० एप्रिल रोजी परिक्षेची ‘अॅडमिट कार्ड्स’ दिली जातील.
बार कौन्सिलने यंदापासून केलेल्या नव्या नियमानुसार या परिक्षेला जाताना उमेदवारांना सोबत कोणतीही पुस्तके, टिपणे किंवा ‘स्टडी मटेरियल’ नेता येणार नाही. मात्र ते कोणत्याही टिपा नसलेल्या कायद्यांच्या मूळ संहिता सोबत नेऊ शकतील.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला