सर्व मिळून भाजपाचे राज्यातील वर्चस्व कमी करू – पृथ्वीराज चव्हाण

Prithaviraj Chavan-BJP

कराड (सातारा) :- खडसे आणि महाविकास आघाडीतील (MVA) सर्व पक्ष मिळून भाजपचे राज्यातील वर्चस्व कमी करू, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केल्याबद्दल खडसेंचे स्वागत करताना ते बोलत होते. खडसेंना माझ्या शुभेच्छा आहेत, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शुभेच्छा दिल्या.

चव्हाण म्हणालेत – आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपाचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू. निवडणूक जिंकणे एवढाच केंद्र सरकारसमोर विषय आहे. बाकी कशाचे देणे घेणे नाही, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.

बिहारची निवडणूक सुरू आहे. भाजपाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात बिहारमध्ये फुकट कोरोनाची लस देऊ असे आश्वासन दिले. मी त्या वक्तव्याचा निषेध केला. असे बिहारपुरते केंद्र सरकारला करता येणार नाही. केवळ राजकारणासाठी, मते मिळवण्यासाठी लस देणे निषेधार्ह आहे. त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांना सर्वच राज्यांनाच लस द्यावी लागेल. महामारीबद्दल राजकारण करू नये, असे आमचे म्हणणे आहे, असे ते म्हणालेत.

मोदी सरकारला (Modi Government) शेतकऱ्यांचे काहीही देणघेण नाही. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली याकडे लक्ष नाही, फक्त निवडणूक जिंकणे एवढाच त्यांच्यासमोर विषय आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.

ही बातमी पण वाचा : त्यांनी इतिहास जरा चाळून पहावा, भाजपावर संजय राऊतांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER