अख्खा दिवस गेला तरी काँग्रेस नेतृत्वाने बाळासाहेबांची आठवणही काढली नाही – नितेश राणे

Balasaheb Thackeray-Nitesh Rane

मुंबई :- आज हिंदु हृदयसम्राट दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८ व्या स्मृतीदिनी राज्यातील सर्वच दिग्गजांकडून आदरांजली वाहण्यात आली. भाजपा नेत्यांनीही बाळासाहेबांच्या आठवणी जागवत श्रद्धांजली वाहिली. तर, राणे पिता पुत्रांकडूनही बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले. मात्र, बाळासाहेबांना अभिवादन करताना, शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्यही करण्यात आलं. खासदार नारायण राणे, निलेश राणे (Nilesh Rane) आणि आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

नितेश राणे यांनीही आज दोन ट्विट करत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केले. नितेश यांनी उद्धव ठाकरे इंदिरा गांधींना अभिवादन करतानाचा फोटो ट्विट करतात. “दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या फोटोसमोरील राहुल गांधींच्या अशाच फोटोची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही?? असा खोचक प्रश्न केला होता. त्यानंतर, लगेच दुसरे ट्विट करुन अख्खा दिवस गेला तरी काँग्रेस नेतृत्वाकडून बाळासाहेबांच्या पुण्यतिथीदिनी एक मेसेज किंवा ट्विटही केलं नसल्याचं नितेश यांनी म्हटलंय. तसेच, जर बाळासाहेबांनाही मान्य करत नसतील तर शिवसेनेकडे काय उरलं? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER