निर्भया : दोषींना एकत्रच फाशी, तुरुंग प्रशासन झोपले होते का? उच्च न्यायालयाचे ताशेरे

Delhi High Court Nirbhaya

नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील सर्व दोषींना एकत्रच फाशी देण्याचा निर्णय आज बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला.
सर्व दोषींना लवकर फाशी देण्याची विनंती करणारी याचिका केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्व दोषींना सात दिवसांच्या आत सर्व कायदेशीर मार्ग हाताळण्याची मुदतही यावेळी न्यायालयाने दिली.

‘कोरोना’मुळे भारतातील स्मार्टफोन कंपन्या धोक्यात!

या आरोपींचा डेथ वॉरंट आतापर्यंत दोन वेळा टळला आहे, हे येथे उल्लेखनीय. दोषींना फाशी होण्यात दिरंगाई होत असल्याने उच्च न्यायालयाने तुरुंग प्रशासनाची आज कानउघाडणी केली. २०१७पासून तुरुंग प्रशासन झोपले होते का? अशी संतप्त विचारणा यावेळी न्या. सुरेश कैत यांनी केली. २०१७मध्ये या आरोपींची याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतरही डेथ वॉरंट जारी करण्यात आले नाही की कुणी त्यावर आक्षेपही घेतला नाही, असे न्या. सुरेश कैत आजच्या निकालात म्हणाले.