राज्यातील सर्व ४३ लाख शेती पंप चुकीची वीज बिले दुरुस्त होणार – उर्जामंत्री राऊत

nitin Raut

मुंबई : “राज्य सरकारने कृषि पंप वीज जोडणी धोरण २०२० व त्या अंतर्गत कृषि वीज बिल सवलत योजना जाहीर केली आहे. ही योजना राबविताना राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांची थकीत वीज बिले तपासली जातील व चुकीची सर्व वीज बिले दुरुस्त करण्यात येतील. तसेच राज्यातील सर्व प्रलंबित वीज जोडण्या त्वरीत पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी आवश्यकतेनुसार सौर पंप व वीज जोडण्यांचे उद्दीष्ट वाढविण्यात येईल.

शेतकरी ग्राहकांना दिवसा वीज देण्याची योजना ३ वर्षांत पूर्ण करण्यात येईल.” असे आश्वासन राज्याचे उर्जामंत्री ना. नितीन राऊत यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्या संयुक्त शिष्टमंडळास दिले आहे. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर व खानदेश डेव्हलपमेंट असोसिएशन यांनीही शेतकरी ग्राहकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या या बैठकीस माजी खा. राजू शेट्टी, प्रताप होगाडे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER