कंप्यूटर बाबांच्या आश्रमात अलिशान बाथरूम; तलवारी आणि बंदुका सापडल्या !

baba

भोपाळ : मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) कंप्युटर बाबांचा (computer baba) आश्रमावर धडक कारवाई करून बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले. आश्रमात आलिशान बाथरुम आणि काही तलवारी – बंदुका सापडल्या!

या कारवाईमुळे राज्यातलं वातावरण तापल आहे. काँग्रेसने ही सूडाची कारवाई असल्याचा आरोप केला आहे. याबाबांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सरकारविरुद्ध लोकशाही ‘बचाओ यात्रा’ काढली होती त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असा काँग्रेसचा आरोप आहे.

आश्रमात तलवारी आणि बंदुका कशासाठी आणल्या होत्या याचा तपास पोलीस करत आहेत. बाबा आणि त्यांच्या ६ सहकाऱ्यांना इंदुरच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. मी जेलमध्ये जाऊन बाबांची भेट घेणार असे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.

रविवारी सकाळी कंप्युटर बाबांच्या आश्रमावर कारवाई करण्यात आली. कंप्युटर बाबांकडून करण्यात आलेलं अतिक्रमण तातडीने हटवण्यासाठी जिल्ह्या प्रशासनाने बुलडोजर आणून कारवाई केली.

जिल्हाधिकारी मनीष सिंह, एडीएम अजय देव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जमुडिहाबाशी गावात नामदेव दास त्यागी (कंप्युटर बाबा) यांनी केलेले अतिक्रमण हटविले असून एडीएम अजयदेव शर्मा व अन्य एसडीएम व पोलिस अधिकाऱ्यांची टीम आज सकाळपासून कारवाई करीत आहे. बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.

८० कोटींचे बांधकाम पाडले

जिल्हा प्रशासनाने जे अतिक्रमण पाडले त्याची किंमत अंदाजे ८० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. ४० एकरपेक्षा जास्त परिसरात पसरलेल्या या आश्रमावर बुलडोजर चालवण्यात आला. एक तासाच्या कारवाईत संपूर्ण आश्रम जमीनदोस्त करण्यात आला. रविवारी सकाळी गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER