अर्णबने पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप न्यायालयाने फेटाळला

Arnab Goswami

अलिबाग : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांचा पोलिसांकडून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अर्णब गोस्वामी यांनी दुपारच्या सत्रात अलिबाग पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे आरोप केले होते. यावेळी त्यांनी माझ्या हाताला आणि पाठीला दुखापत झाल्याचेही अर्णव गोस्वामी यांनी म्हटले होते. मात्र, न्यायालयाने व्हिडीओ क्लीप आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल ग्राह्य धरत अर्णव गोस्वामी यांचे हे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे आता अर्णव गोस्वामी यांची पोलीस कोठडीत रवानगी होण्याची शक्यता वाढली आहे.

दुसरीकडे, अलिबागनंतर आता मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध नवा गुन्हा दाखल केला आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कलम ३५३ नुसार अर्णब गोस्वामीवर केला गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे असे आरोप करत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER