अबब! आलियाची ‘गंगुबाई’ इतक्या कोटींना घेतली ओटीटी प्लॅटफॉर्मने

Gangubai Kathiawadi

कोरोना (Corona) काळात थिएटर बंद असल्याने प्रेक्षकांना घर बसल्या मनोरंजनाची सोय ओटीटी प्लॅटफॉर्मनी करून दिली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मकडे (OTT Platform) प्रेक्षकांचा वाढता ओढा पाहून आज एक-दोन नव्हे तर दहाच्या वर ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. यापैकी काही ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतःच कार्यक्रमांची निर्मिती करीत आहेत तर नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हीडियो मात्र बॉलिवूड (Bollywood) आणि हॉलिवूडचे (Hollywood) मोठे सिनेमे विकत घेऊन ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच अमिताभच्या गुलाबो सिताबोपासून अक्षयच कुमारच्या लक्ष्मीपर्यंत अनेक सिनेमाचे प्रीमियर थेट ओटीटीवर झाले होते. मात्र अक्षयचा (Akshay Kumar) ‘लक्ष्मी’, आलियाचा (Alia Bhatt) ‘सडक-2’ आणि वरुण धवनचा (Varun Dhawan) ‘कूली नंबर वन’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुपर फ्लॉप ठरले होते. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म आता सिनेमे निवडून घेऊ लागले आहेत. संजय लीला भंसाळीचा हिट सिनेमाचा रेकॉर्ड कायम असल्याने त्याचा नवा ‘गंगुबाई काठियावाडी’ ओटीटी प्लॅटफॉर्मने मोठ्या किमतीला विकत घेतला आहे.

संजय लीला भंसाळीने (Sanjay Leela Bhansali) गेल्या वर्षी आलिया भट्टला घेऊन ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमाला सुरुवात केली होती. क्वींस ऑफ मुंबई या पुस्तकातील एक प्रकरण गुजरातमधील महिला डॉन गंगूबाई काठियावाडीवर आधारित आहे. याच प्रकरणावर संजय लीला भंसाळी हा सिनेमा बनवत आहे. हा सिनेमा आता पूर्णत्वाकडे असून यावर्षी रिलीज केला जाणार आहे. या सिनेमाची क्रेज पाहून याच्या डिजिटल राइट्सचे अधिकारी एका ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल 70 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER