आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ तेलुगुतही रिलीज होणार

Maharashtra Today

संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) निर्मित आणि दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiyawadi) सिनेमाची केवळ बॉलिवूडच नव्हे तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येही खूप चर्चा आहे. आलिया भट्टचा (Alia Bhatt) लुक, अभिनय आणि एकूणच सिनेमाची कथा, सादरीकरण खूपच चांगले झाले असल्याने हा सिनेमा केवळ हिंदीतच रिलीज करण्याऐवजी साऊथमध्ये तेलुगु भाषेतही रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतः आलिया भट्टनेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका व्हीडियोच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. यासाठी तेलुगु भाषेतील टीझर तयार करण्यात आला असून हा टीझर साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणच्या (Pawan Kalyan) ‘वकील बाबू’ (Vakeel Babu) सिनेमासोबत दाखवला जाणार आहे. संजय लीला भंसाळीने फेब्रुवारी महिन्यात हिंदी टीझर रिलीज केला होता.

आलिया तेलुगु भाषेतील टीझरबाबत खूपच उत्साहित असून तेलुगु भाषेबाबत तिला प्रेम असल्याचेही तिने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर पवन कल्याण आणि त्याच्या वकील साब सिनेमाला तिने शुभेच्छाही दिल्या आहेत. वकील साब हा हिंदीमध्ये आलेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अभिनीत ‘पिंक’ (Pink) सिनेमाची रिमेक आहे. पिंकला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. बॉक्स ऑफिसवरही पिंकने चांगलाच व्यवसाय केला होता. पिंक सिनेमाचा तामिळमध्येही रिमेक करण्यात आला होता आणि या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. पवन कल्याणचा ‘वकील साब’ १५ मे रोजी साऊथमध्ये रिलीज केला जाणार आहे.

या सिनेमासोबतच आलियाच्या गंगुबाईचा टीझर थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. संजय लीला भंसाळीसोबत पेन स्टूडियोनेही याच्या निर्मितीत सहभाग नोंदवला आहे. हिंदीप्रमाणेच साऊथ इंडस्ट्रीही मोठी असून तेथेही चांगले सिनेमे कोट्यावधींचा व्यवसाय करतात. त्यामुळेच संजय लीला भंसाळीने हा सिनेमा तेलुगुमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जुलैला हा सिनेमा हिंदी आणि तेलुगुमध्ये रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button