आलियाने सुरु केले ‘गंगुबाई काठियावाड’चे शूटिंग

Gangubai Kathiawadi

प्रख्यात निर्माता दिग्दर्शक संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali) गुजरातची लेडी डॉन गंगुबाई काठियावाडीच्या (Gangubai Kathiawadi) जीवनावर एक सिनेमा बनवत आहे. यात आलिया भट्ट गंगुबाईची भूमिका साकारीत आहे. खरे तर हा चित्रपट यावर्षीच प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सिनेमाचे शूटिंगच होऊ शकले नव्हते. खूप महिने सेट पडून राहिल्याने लॉकडाऊन उठल्यानंतर तो पुन्हा नव्याने तयार करण्यात आला आणि आता शूटिंगही सुरु झाले आहे. आलियाने गंगुबाईचे शूटिंग सुरु केल्याची माहिती दिली.

शूटिंगचा अनुभव सांगताना आलियाने म्हटले, गंगुबाईच्या सेटवर जाऊन टीमला पुन्हा एकदा भेटताना मला खूपच आनंद झाला आहे. मात्र कोरोनामुळे (Corona) सेटवर अनेक नियम घालून देण्यात आले असून त्याचे पालन करूनच शूटिंग केले जात आहे. खरे तर सुरुवातीला मला थोडी भिती वाटत होती. परंतु आता आपल्याला या नियमांसोबतच राहायचे असल्याने मी स्वतःला यासाठी तयार केले. सेटवर सगळेच जण या नियमांचे पालन करीत आहेत असेही आलियाने सांगितले.

‘गंगुबाई काठियावाड’नंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) एस. एस. राजामौलीच्या भव्य आरआरआर या ऐतिहासिक चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादला रवाना झाली. या चित्रपटात आलियासोबत राम चरण, जूनियर एनटीआर आणि अजय देवगन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

ही बातमी पण वाचा : कार्तिकने शाहरुख, अक्षय आणि सलमानचे बिझिनेस मॉडेल स्वीकारले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER