आलिया भट्टने नाकारला रसुल पुकुट्टीचा सिनेमा

रसुल पुकुट्टी हा साऊथ आणि बॉलिवुडमधील प्रख्यात साउंड डिझाइनर आहे. स्लमडॉग मिलेनियर या सिनेमासाठी त्याला ऑस्करही मिळाले होते. हिंदीत त्याने ब्लॅक, जिंदा, ट्रॅफिक सिग्नल, गांधी माय फादर, सावरिया ते काबिल अशा अनेक हिट सिनेमांचे साऊंड डिजाइन केले आहे. रसुलने नथुला पासमध्ये भारत-चीन दरम्यान 1967 च्या युद्धातील एका घटनेवर आणि त्यातील प्रेमकथेवर सिनेमा बनवण्याची योजना आखली होती. या सिनेमातील मुख्य भूमिका साकारण्यासाठी त्याने आलिया भट्टला विचारले होते. सिनेमाची कथा ऐकून आलियाने होकार दिला होता. मात्र आता आलिया हा सिनेमा करणार नसल्याचे समजते.

याबाबत सूत्रांनी माहिती देताना सांगितले, सिनेमाची कथा खूपच चांगली असल्याने आणि रसूल सिनेमाशी जोडला गेलेला असल्याने आलियाने होकार दिला होता. तिच्याकडे तीन मोठे सिनेमे असतानाही तिने होकार दिला होता. त्यानंतर रसूल आणि आलियामध्ये डेट्सबाबत चर्चा होत होती. मात्र अयान मुखर्जीचा रणबीर कपूरसोबतचा ब्रह्मास्त्र, संजय भंसालीचा गंगूबाई काठियावाडी, आणि राजामौलीचा बहुचर्चित आरआरआर सिनेमांना डेट्स दिल्या असल्याने आलियाकडे रसूलच्या सिनेमाला द्यायला डेट नसल्याने आलियाने हा सिनेमा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र बॉलिवुडमध्ये चर्चा आहे की, दिग्दर्शकामुळे आलियाने सिनमा सोडला. खरे तर आलियाला वाटले होते की या सिनेमाचे दिग्दर्शन रसूल स्वतः करणार आहे. परंतु रसूलने त्याच्या सहाय्यकाकडे दिग्दर्शन सोपवल्याने आलियाने विचार न करता ऑफर फेटाळून लावली. रसूल दिग्दर्शन करीत असता तर आलियाने नक्कीच डेट्स दिल्या असत्या असेही सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER