आई-मुलीची वेगळी कथा सांगण्यासाठी आलिया भट्ट आणि शेफाली शाह एकत्र

शाहरुख खान (Shah Rukh Khan) सिनेमापासून दोन वर्षांपासून दूर असला तरी त्याने त्याच्या निर्मिती संस्थेतर्फे सिनेमांची निर्मिती सुरुच ठेवली होती. अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेला ‘बॉब विस्वास’ सिनेमाची निर्मिती शाहरुखने केली असून हा सिनेमा नुकताच पूर्ण झाला आहे. यापूर्वी त्याने अमिताभ आणि तापसीचा ‘बदला’ ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही वेबसीरीजही त्याने तयार केली होती. आता शाहरुखने एका नव्या सिनेमाला सुरुवात केली आहे. हा सिनेमा आई आणि मुलीच्या केमिस्ट्रीवर आधारित हा सिनेमा असून यात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि शेफाली शाह (Shefali Shah) मुलगी आणि आईच्या भूमिकेत दिसणार आहेत.

शाहरुख खानने आलियासोबत ‘डियर जिंदगी’ सिनेमा केला होता. वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा प्रेक्षकांना बऱ्यापैकी आवडला होता. त्यानंतर आता पाच वर्षांनी शाहरुख आणि आलिया या सिनेमासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. या सिनेमाचे नाव ‘डार्लिंग्स’ असे ठेवण्यात आलेले आहे.

‘डार्लिंग्स’चे दिग्दर्शन जसमीत करीत असून दिग्दर्शनाचा तिचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यापूर्वी जसमीतने ‘फोर्स 2’, ‘फन्ने खान’ आणि ‘पति पत्नी और वो’ या सिनेमांचे लिखाण केलेले आहे. ‘डार्लिंग्स’मध्ये विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमात एका अशा विचित्र आई-मुलीच्या जोडीची कथा दाखवण्यात येणार आहे ज्या काही तरी वेगळे वागण्याचा प्रयत्न करणाऱ्या असतात. त्यांचे जीवन वेडेपणाने भरलेले असते. आई-मुलीची ही जोडी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असते. साहस आणि प्रेम या दोन गोष्टी या दोघी कोणत्या आणि कशा परिस्थितीत दाखवतात ते दाखवण्याचा प्रयत्न जसमीतने केला आहे. मार्चमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु केले जाणार असून त्याच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरु करण्यात आले आहे. हा सिनेमा याचवर्षी रिलीज करण्याचा शाहरुख खानचा विचार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER