आलिया भट्टलाही झाली कोरोनाची लागण, ‘गंगुबाई काठियावाड़ी’चे शूटिंग थांबले

अगोदर बॉयफ्रेंड रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि नंतर ‘गंगुबाई काठियावाड़ी’चा निर्माता दिग्दर्शक संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) यांना कोरोनाने गाठले. कोरोनाचा संसर्ग झाली की नाही हे पाहाण्यासाठी त्यानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) सतत स्वतःची कोरोना टेस्ट करवून घेऊ लागली होती. तिची कोरोना टेस्ट निगेटिव्ह येत असे. तरीही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ती पुरेपूर काळजी घेत होती. सतत हात धुणे, सॅनिटाईझ करणे, गाडी, घर एवढेच नव्हे तर ती जेथे जाईल तेथे सॅनिटायझेनची काळजी घेतली जात असे. मात्र एवढी काळजी घेऊनही अखेर आलिया भट्टलाही कोरोनाने गाठले. स्वतः आलियानेच सोशल मीडियावर तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

आलियाला कोरोना झाल्याने आता पुन्हा एकदा ‘गंगूबाई काठियावाड़ी’ सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे (Gangubai Kathiyawadi Shooting Stopped). याअगोदर दिग्दर्शक संजय लीला भंसाळीला कोरोनाची लागण झाल्याने सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. यावेळी निर्मात्यांची संघटना Federation of Western India Cine Employees (FWICE) ने सिनेमाचे शूटिंग थांबवण्याचा आदेश संजय लीला भंसाळीला दिला आहे. FWICE ने सेटवरील सगळ्या टेक्नीशियन्स आणि कामगारांना आणखी काही दिवस ‘गंगूबाई काठियावाड़ी’च्या शूटिंगला जाऊ नये असे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर जर एखाद्याला थोडे जरी लक्षण असेल तर त्याने लगेचच कोरोना टेस्ट करून घ्यावी असेही संस्थेने सगळ्यांना बजावले आहे.

आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून त्यात तिने म्हटले आहे, ‘हॅलो, मला कोरोनाची लागण झाली असून मी सध्या घरातच आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी लगेचच स्वतःला क्वारंटाईन केले आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी कोरोना नियमांचे पालन करीत आहे. तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि सहकार्यासाठी आभार. तुम्हा सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या.’ असेही आलियाने पोस्टमध्ये लिहिले आहे. आलिया सध्या गंगुबाई काठियावाडसोबतच रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ आणि राजामौलीचा महत्वाकांक्षी मल्टीस्टारर ‘आरआरआर’ मध्येही काम करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button