दिल्लीतील बॉम्ब स्फोटानंतर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा

Anil Deshmukh & Ajit Pawar

मुंबई : दिल्ली येथे आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी इस्रायलच्या दूतावासाजवळ बॉम्ब स्फोट झाला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गृहमंत्री (Anil Deshmukh) व पोलिस महासंचालकांशी चर्चा करून मंबई, पुण्यासह राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिलेत.

जननेतेही सतर्क राहण्याची सूचना देतांना पवार म्हणालेत, कोणालाही आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवा. सतर्क रहा. प्रशासनाला सहकार्य करा. दिल्लीत झालेला स्फोट कमी तीव्रतेचा होता. प्राणहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही. काही मोटारीच्या काच फुटल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER