
ऋतुनुसार विविध पदार्थ करणे ही भारतीय आहार संस्कृतींची खासियतच आहे. थंडीच्या दिवसात आलेपाक बऱ्याच बनत असतो. कफाचा त्रास कमी करणारा हा आलेपाक परीचयाचा आहे. आलेपाक नक्की कसा करावा याचा संदर्भ आयुर्वेद (Ayurveda) ग्रंथातही मिळतो. बघूया थोडी वेगळी पद्धत.
आल्याचे साल काढून बारीक तुकडे करावे. जेवढे आर्द्रक अर्धा किलो असेल तर तेवढ्याच प्रमाणात गुळ घ्यावा. अर्धा पाव तूपावर आले छान लालसर होईस्तोवर भाजून घ्यावे त्यात गुळाचा पाक करून घालावा. त्यानंतर त्यात सुंठ, जीरे, मिरे पूड, केसर, जावित्री, विलायची, दालचीनी, तेजपत्र, पिंपळी, धान्यक, जीरे, वावडिंग चूर्ण प्रत्येकी 5- 5 ग्रंम टाकावे. हे सर्व एकत्र करून ठेवावे. हा आलेपाक औषधी गुणयुक्त असतो.
सर्दी खोकला दमा आवाज बसणे या सर्वच तक्रारींवर आर्द्रकपाक उपयोगी ठरतो. वात कफप्रधान व्याधींवर हे औषध उपयोगी आहे. अरुचि, भूक न लागणे, उदर शूल, पोटात वायूचा गोळा होणे अशा तक्रारींवर हे औषध उपयोगी आहे. श्वास घेतांना त्रास होणे, कफ अडकल्याप्रमाणे वाटणे या त्रासावर आलेपाक उपयोगी आहे. आलेपाक हे कफ विकारांवर उपयोगी आहे. पाचक तसेच रुचि आणणारे हे आर्द्रक पाक थंडीच्या दिवसात नक्कीच चाखण्यासारखे आहे.
ह्या बातम्या पण वाचा :
- गुलकंद : थंडावा आणणारे प्रभावी औषध !
- हिमफाण्ट निर्माण – आजार थकवा घालवण्याकरीता उपयुक्त औषधीकल्प !
- जेवण करतांना पाणी कधी व कसे प्यावे ?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला